← Musical Journey

लेखिकेचे मनोगत

by Dr. Manasi Arkadi

(26)

नमस्कार!

गेली दीड वर्ष या लेखांच्या माध्यामातून मी तुमच्याशी संवाद साधत आले. खरंतर, तुमच्यापैकी कोणालाच मी प्रत्यक्ष बघितलेलं नाहीये, पण का कुणास ठाऊक आपली खूप जुनी ओळख आहे असं मला आताशा वाटायला लागलं आहे. म्हणूनच, आज काही गोष्टी मी तुमच्याशी शेअर करणार आहे. To start with, मी लेखिका, अभ्यासक, जाणकार, व्यासंगी यापैकी काहीही नाही. लेख पोस्ट केल्यानंतर अगदी परीक्षेला निघाल्यासारखी हुरहूर मला देखील वाटायची, आवडेल ना सगळ्यांना, वाचतील ना सगळे इथपासून ती अस्वस्थता सुरु व्हायची. पण मग तुमचे 'likes' यायला लागले की माझा confidence वाढायचा, अपेक्षा वाढत जायची, ठराविक प्रतिक्रियांसाठी FB च्या सारख्या चकरा मारायचे आणि त्या आल्या की मुठभर मास चढायचं. त्यानंतर उगाचच 'आजकल पाँव जमींपर नहीं पड़ते मेरे' अशा तोऱ्यात मी असायचे!. खरंतर, या likes/comments माझ्यासाठी नाहीत हे मी जाणून होते, पण तरीही मी लिहिलेलं तुम्ही आवडीने आणि लक्षपूर्वक वाचत आहात ही भावना सुखावणारी होती. तुमच्या आवडत्या व्यक्तीची तुम्हाला नव्याने ओळख होत आहे हा विचार पुढचा लेख लिहायला प्रोत्साहन देणारा होता!

याची सुरवात कशी आणि कुठून झाली हे तुम्हाला सांगायचं झालं तर आधी मला माझ्या (one of the) वाईट सवयीविषयी सांगायला लागेल. अगदी लहानपणापासून मला चकचकीत रिफाइंड प्रॉडक्ट पेक्षा त्याच्या मेकिंग मधे जास्त रस आहे. मी 'वरलिया रंगा' भूलणार्यांपैकी नाही. पडद्यावरच्या glamorous लुकचा हेवा करण्याअगोदर नेहमीच मला त्यासाठी घेतलेले कष्ट, खाललेल्या खस्ता, पचवलेले अपमान, अवहेलना हे जाणून घेण्यात जास्त इंटरेस्ट आहे. रोटरीच्या कार्यक्रमानिमित्ताने शेखरशी ओळख झाल्यावर आणि त्या अनुषंगाने त्याचे शो बघितल्यावर माझा हा चिकित्सक स्वभाव मला स्वस्थ बसू देईना. या टप्प्याला येईपर्यंत त्याच्या सांगीतिक आयुष्यात आलेले